Call Us - 7744941233 | Write To - vidyabharti.nagpur@gmail.com

संस्कृति ज्ञान परीक्षा

संस्कृति ज्ञान परीक्षा

विदर्भ में संस्कृति ज्ञान परीक्षा प्रतिवर्ष कक्षा 3री से 9वीं के बालकों के लिए आयोजित की जाती है । कोई भी विद्यालय इस परीक्षा में सहभागी हो सकता है ।

इस परीक्षा के माध्यम से छात्रों को भारतीय, संस्कृति, धर्म, इतिहास, पर्व, तीर्थ स्थलों, पवित्र नदियां – पर्वतों एवं राष्ट्रीय महापुरुषों के बारे में जानकारी अत्यंत रोचक एवं सहज पद्धति से दी जाती है । भारतीय संस्कृति एवं राष्ट्रीय एकता को पुष्पित एवं पल्लवित करने के लिए यह योजना पोषक सिद्ध हो रही है ।

परीक्षा के लिए छात्रों को साहित्य वितरित किया जाता है । परीक्षा का वार्षिक कार्यक्रम घोषित किया जाता है । इन्हीं पुस्तकों के आधार पर प्रश्न मंच भी आयोजित किया जाता है ।


मा. मुख्याध्यापक
स.न.वि.वि.

संस्कृती ज्ञान परीक्षा हा एक उपक्रम देशभरातील अनेक विद्यालयात सन 1980 पासून मोठ्या प्रमाणावर विद्या भारती राबवित आहे. जगातील सारेच देश आपली संस्कृती, परंपरा, जीवनमूल्ये, महान व्यक्तींचे आदर्श भावी पिढीत शिक्षणाच्या माध्यमातून रुजविण्याचा प्रयत्न करीत असतात. भारताची महान आध्यात्मिक संस्कृती, थोर परंपरा, जीवनमूल्ये व थोर पुरुषांचे आदर्श त्यांच्या जीवनगाथा आणि येथील ज्ञानगंगा आपल्या देशाचेच नव्हे तर जगाचे श्रेष्ठ धन आहे. त्यांचा परिचय विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान- विज्ञानाच्या अभ्यासक्रमाबरोबरच करून दिला तर विदेशी संस्कृतीचे अंधानुकरण करण्याच्या प्रवृत्तीमध्ये इष्ट तो बदल घडवून आणून राष्ट्राभिमान जागृत करता येईल, अशी आपली दृढ श्रद्धा आहे. समृद्ध व विविधतेने नटलेल्या भारतीय परंपरांचा पाईक होण्याची पात्रता विद्यार्थ्याच्या अंगी यावी या उद्देशाने विद्या भारतीच्या वतीने विदर्भात अखिल भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षेचे आयोजन गेल्या 28 वर्षांपासून केले जात आहे. या परीक्षेत दरवर्षी देशभरात सुमारे 30 लाख तर महाराष्ट्रातून 1 लाख विद्यार्थी बसतात.

ही परीक्षा मूल्य शिक्षणाच्या अंतर्गत घेता येईल व रिक्त तासिकेला या परीक्षेचा अभ्यासक्रम शिकविता येईल. तरी आपल्या विद्यालयातील अधिकाधिक विद्यार्थी या परीक्षेला बसवावेत, ही विनंती.

परीक्षेसाठीच्या पुस्तकांचा खर्च प्रति विद्यार्थी रू.50/- असून विद्या भारती कार्यालयाला प्रति विद्यार्थी रू.45 पाठवावे आणि रू.5/-पर्यवेक्षकांचे मानधन, टपाल खर्च व अन्य किरकोळ खर्चासाठी शाळेने ठेवावे.
विद्यार्थी संख्या खालील लिंक वर दि. 10 सप्टेंबर 2024 पूर्वी नोंदवावी.
संस्कृती ज्ञान परीक्षा 2024-25
खालील माहिती भरून पाठवा
.

रक्कम विद्या भारतीच्या खात्यात ऑनलाईन जमा करावी.
आपला
मंगेश पाठक
मंत्री, विद्या भारती विदर्भ