Call Us - 7744941233 | Write To - vidyabharti.nagpur@gmail.com

संस्था संचालकांचा वर्ग संपन्न

पश्चिम विदर्भातील शिक्षण संस्था संचालकांचा वर्ग संपन्न

विद्या भारती विदर्भ प्रांताचे आयोजन

अकोल्यातील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय येथे पश्चिम विदर्भातील शिक्षण संस्था संचालकांसाठी एक दिवसीय वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. वर्गाच्या उदघाटन प्रसंगी मंचावर उद्घाटक म्हणून रा.स्व.संघाचे महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल, प्रमुख वक्ते डॉ. प्रवीण डाबरे, विद्या भारती क्षेत्राचे उपाध्यक्ष प्रेमराज भाला, प्रांत अध्यक्ष रामचंद्र देशमुख, उपस्थित होते. प्रास्ताविकामध्ये प्रांत उपाध्यक्ष सचिन जोशी यांनी विद्या भारतीच्या कार्यवर व वर्गाच्या आयोजना मागील भूमिका या विषयावर प्रकाश टाकला. उद्घाटक गोपाल खंडेलवाल यांनी संस्था संचालकांना मार्गदर्शन केले.

डॉ. प्रवीण डाबरे यांनी NAAC मूल्यांकन करण्यापूर्वी करावयाचे कार्य विषयावर तर डायटचे डॉ. जितेंद्र काठोळे यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण व अंमलबजावणी बाबत, दिलीप जोशी यांनी शिक्षण संस्था संचालनातील शैक्षणिक समस्या व उपाय या विषयांवर उत्तम मार्गदर्शन केले. समारोप प्रसंगी विद्या भारतीचे प्रांत अध्यक्ष यांनी आपल्या संस्थेतील शिक्षकांना भारत केन्द्रित शिक्षण देण्यास शिक्षकांना प्रवृत्त करावे असा आग्रह केला. त्यादृष्टिने आपल्या संस्थेत सांस्कृतिक कार्यक्रम कसे होतील याचा विचार करावा असेही ते म्हणाले.

या एक दिवसीय वर्गाचे संचालन आकांक्षा देशमुख यांनी केले तर आभार सचिन जोशी यांनी मानले. विदर्भातील अनेक शिक्षण संस्था संचालक यांच्या सह विश्व मांगल्य सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा रेखा खंडेलवाल तसेच शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. तारा हातवळणे, विद्या भारतीचे प्रांत संघटन मंत्री शैलेश जोशी, प्रांत उपाध्यक्ष सत्यानंद कांबळे, प्रांत मंत्री मंगेश पाठक, सहमंत्री रामेश्वर कुटे, समीर थोडगे, अकोला जिल्हा अध्यक्ष विठ्ठल खारोडे, जिल्हा मंत्री शरद वाघ, जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. विक्रम जोशी, महानगर मंत्री योगेश मल्लेकर, गिरीश कानडे, पल्लवी कुलकर्णी, लता कुर्हेकर, अमृतेश अग्रवाल, शुभांगी जोशी, अंजली मुकवाणे, अंजली अग्निहोत्री उपस्थित होते.

About Author


admin